मेहदी हसन : अबके हम बिछडे
सांस्कृतिक : अमर पुराणिक आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने गजल पोरकी झाली. एक ‘दादा कलावंत’ आपल्यातून गेला, पण आपल्यासाठी अमूल्य गजलांचा,…